लाडक्या बहिणींना आतुरता,”मे” चे आले, आता “जून” चे कधी येणार? … वाचा..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आधीच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला. उशिरा का होईना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.
आता लक्ष जून चे १५०० कधी येणार? जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु आता एवढ्यात तरी जूनच्या हप्त्याबाबत काही घोषणा होईल, असं वाटत नाही.
अस सांगितलं जात होतं की मे आणि जून या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार मात्र तसे न होता मे महिन्याचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. लाडकी बहीण योजनेत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे डोळे लागले आहे.