जळगाव जिल्हा चर्मकार संघाची नवीन कार्यकारिणी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगांव येथे शनिवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत जळगाव जिल्हा चर्मकार संघाची सहविचार सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी खामकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री विश्वनाथजी सावकारे, श्री संजयजी वानखेडे सर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार साहेब,चर्मकार संस्थांचे अध्यक्ष श्री वसंतराव नेटके, काशीनाथ इंगळे. खंडू पवार, संजय भटकर सर ,सौ.खामकर मॅडम व मोठ्या संख्येने उपस्थित समाज बंधू भागिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते जगतगुरु संत रविदास महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्ल्यारपण करण्यात आले.या वेळेस प्रमुख अतिथींचा सत्कार शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व संत रविदास यांची प्रतिमा देऊन करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त झालेले व आदर्श पुरस्कार प्राप्त समाज बंधूचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कारमूर्ती ,श्री.सतीश शिंदे ,श्री. शिवराज कळसकर, श्री.निवृत्ती सूर्यवंशी श्री.संजय भारुळे,श्री.नारायण तायडे,श्री.रमेश भोळे,श्री.प्रकाश रोजतकर,श्री.कैलास वाघ,श्री.बाळकृष्ण खिरोळे,श्री.रतीराम सावकारे,आदींचा सत्कार करण्यात आला.
या वेळेस नवीन जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली.यामध्ये जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाचे जिल्हा अध्यक्षपदी ॲड श्री.अर्जुन भारुळे,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राजेश वाडेकर सर ,जिल्हा सचिव प्रा.धनराज भारुडे सर ,जिल्हा सह सचिव संदीप ठोसर सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय पवार साहेब, जिल्हा उपाध्यक्ष श्री.गजानन दांडगे सर, जिल्हा युवा संघटk श्री शिवराज कळसकर ,राज्य कार्यकारिणी सदस्य पदी श्री.संजय भटकर सर, खान्देश विभागीय अध्यक्ष श्री.मनोजभाऊ सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष श्री.कमलाकर ठोसर,महानगर कार्याध्यक्ष श्री.पंकज तायडे, उपाध्यक्ष प्रा.संदीप शेकोकार, उपाध्यक्ष श्री.यशवंत वानखेडे, सचिव पंकज भारुळे, प्रसिद्धी प्रमुख लोकेश भारुडे, महानगर युवा संघटन योगेश वाडीले,तर जळगाव तालुका अध्यक्ष श्री.रवींद्र नेटके,सचिव श्री. ज्ञानेश्वर शेकोकार , जळगाव तालुका उपाध्यक्ष सिताराम राखुंडे ,,भुसावळ तालुका अध्यक्ष श्री.प्रवीण बाविस्कर,बोदवळ तालुका अध्यक्ष श्री.अनंत निंबाळकर,चोपडा तालुका अध्यक्ष श्री.प्रशांत सोनवणे,जामनेर तालुकाध्यक्ष श्री.अरुण सावकारे,सचिव श्री.किरण सुरवाडे आदींची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संजयजी खामकर साहेब यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून जोमाने समाज संघटित करून समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.धनराज भारुडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. गजानन दांडगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विश्वनाथ सावकारे,श्री.संजय वानखेडे,ॲड.श्री.अर्जुन भारुळे, श्री.पंकज तायडे,श्री.शिवदास कळसकर, श्री.काशीनाथ इंगळे,श्री.पंकज भारुळे,श्री.योगेश वानखेडे,श्री.लोकेश भारुळे,श्री.कमलाकर ठोसर,आदींनी परिश्रम घेतले.यावेळेस चर्मकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
