भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

जिल्हा परिषदेतील नियमबाह्य ‘गार्ड बोर्ड सुरक्षा रक्षक’ भरतीच्या चौकशीची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | जळगाव जिल्हा परिषद जळगाव मध्ये गार्ड बोर्ड मंडळा मार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली असून या मध्ये लाखो रुपयांचा व्यवहार झाला असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट क्रांती दिन स्वाभिमानी शेतकरी संघटना फटाके फोडो आंदोलन करणार आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या गार्ड बोर्ड मार्फत नियुक्त कंत्राटी सुरक्षा रक्षक भरती मध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून या लाखो रुपयांच्या घोटाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयातील सक्षम दस्तावेजांवर सह्या करणारे अधिकारी तसेच त्यां बनावट दस्तावेजांना पात्र करणारे गार्ड बोर्ड मंडळातील अधिकारी यांचे संगणमत असून या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारातील पैशांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार केली असता यांच्याकडून उडवा उडवीची उत्तर देत गार्ड बोर्ड मंडळाकडे जा आमचा काही संबंध नाही असे सांगितले.

त्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले जिल्हा परिषद प्रशासनातील श्री सुनील पाटील कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्या सह्यांचे आम्हाला दस्तावेज प्राप्त झाले असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांची आम्ही गार्ड बोर्डद्वारे नियुक्ती केली असल्याचे सांगितले याचाच अर्थ सदर भरती घोटाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाचे संबंधित अधिकारी हेच या नियमबाह्य भरतीचे षडयंत्रकार आहेत. कारण या आधी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या शिवा सेक्युरिटीच्या कंत्राटदाराने केंद्र शासनासह,महाराष्ट्र शासनाचे जीएसटी, व्यवसाय कर बुडवत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन सुद्धा दिले गेले नव्हते व ती सर्व तपासण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची होती. असे निवेदनात म्हटले आहे.

मात्र पैशांसाठी हेपापलेल्या या अधिकाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक भले केले यावरूनच या गार्ड बोर्ड मार्फत सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारीच असून त्यांना जिल्हा परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन अभय व आशीर्वाद देत असल्याच्या निषेधार्थ झोपलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर फटाके फोडून आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!