भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

ब्रेकिंग : पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ चा भुसावळ – जळगाव येथे थांबा, कसे आहे वेळापत्रक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नागपूर-पुणे मार्गावर रेल्वे प्रवाशांची नेहमी १२ मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी दोन वर्षांपासून मागणी होती. सध्या नागपूर-पुणे मार्गावर सर्वात वेगाने धावणारी गाडी म्हणजे हावडा-दुरांतो एक्स्प्रेस होय. १२ तास, ५५ मिनिटांत ती नागपूरहून पुण्याला पोहचते. वंदे भारत एक्स्प्रेस १२ तासांतच हे अंतर पूर्ण करणार आहे. दरम्यान, ८१० किलोमीटरचा प्रवास बसून करणे त्रासदायक होत असल्याने ‘वंदे भारत स्लीपर कोच एक्स्प्रेस’ सुरू करावी, अशी मागणी होती.

  • ही गाडी ११ स्थानकांवर थांबणार असून पुण्यात रात्री ९.५० वा. पोहोचेल.
  • पुण्याहून अजनीला निघणारी गाडी सोमवार वगळता दररोज धावेल.

अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर-पुण्यादरम्यानचा प्रवास करताना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड,अहिल्यानगर, कोपरगाव यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गर्दीच्या शहरांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अधिकच सोयीची होणार आहे.

गाडी क्र.२६१०२  अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस दररोज सकाळी साडेनऊ वाजता नागपूरच्या अजनी स्टेशनहून सुटेल आणि रात्री साडे नऊ वाजता पुण्यात पोहचेल. तर गाडी क्र.२६१०२  पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस सायंकाळी साडे सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता अजनी (नागपूर) स्टेशनवर पोहचेल. गाडी क्र.२६१०२  पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर सहा दिवस चालेल. या प्रमाणेच गाडी क्र.२६१०२  अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात मंगळावर सोडून इतर सहा दिवस चालेल…

कसे असेल वेळापत्रक?
गाडी क्र. २६१०२ अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत सकाळी ९:५० वाजता अजनी स्थानकातून सुटेल. वर्धा स्थानकात १०:४० वाजता, बडनेरा १२:०३ वाजता, अकोला दुपारी १ वाजता, भुसावळ दुपारी २:५५ वाजता, जळगाव दुपारी ३:२६ वाजता, मनमाड ५:२५ वाजता, कोपरगाव सायंकाळी ६:२० वाजता, अहमदनगर ७:३५ वाजता दौंड ८:४३ व पुणे येथे रात्री ९:५० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात क्र. २६१०१ वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकातून सुटेल. जळगावला दुपारी १२:३५ वाजता, भुसावळ येथे दुपारी १:०५ वाजता तर अजनी स्थानकावर संध्याकाळी ६:२५ वाजता पोहोचणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!