२४ तासांत ६०,९७५ नवे कोरोना रूग्ण; ८४८ जणांचा मृत्यू !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगभरात कोरोना विषाणूंचा कहर सुरूच आहे, भारतातील कोरोना रुग्णांनी ३१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे संसर्गातून बरे होणार्या लोकांची संख्या २४ लाखांहून अधिक झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ६० हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळल्याने देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ३१ लाख ६७ हजार ३२४ पर्यंत पोहोचला आहे तर सध्या ७ लाख ४ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, आतापर्यंत २४ लाख ४ हजार ५८५ रूग्णांनी कोरोनावर मात करून ते ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या २४ तासात ८४८ जणांचा कोरोनाने बळी गेला असून मृतांची एकूण संख्या ५८ हजार ३९० वर पोहोचला आहे. मृत्यूची संख्या आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या दरात सातत्याने घट नोंदविली जात आहे, ही दिलासादायक बाब असून मृत्यू दर १.८४ % पर्यंत घसरला. या व्यतिरिक्त, उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह प्रकरणांचे प्रमाणही २३ % पर्यंत खाली आले आहे. यासह, रिकव्हरी दर, म्हणजे, पुनर्प्राप्ती दर ७५ % झाला आहे. भारतात रिकव्हरी दर हा सतत वाढत आहे.