भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रराष्ट्रीय

चिंताजनक! १८ राज्यांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली: वृत्तसंस्था। देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच १८ राज्यांमध्ये कोरोनाचा नवा डबल म्युटेंट व्हेरियंट (vocs) आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचप्रमाणे विदेशातही कोरोनाचे नवे स्ट्रेन, व्हेरियंट आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार INSACOG ने नव्या व्हेरियंटवर (variants) काम सुरु केले आहे. देशातील अनके राज्यांमधून १०७८७ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमधून ७७१ नवे व्हेरियंट (variants) आढळले आहे. यातील ७३६ पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये युके व्हेरियंट आढळला आहे. ३४ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेचा व्हेरियंट आढळला आहे. तर १ चाचणीमध्ये ब्राझील व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे एकूण १८ राज्यांमध्ये डबल म्युटेंट व्हेरियंट VOCs आढळला आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरीयंटने देशाची चिंता आणखी वाढली आहे.

देशातील १० प्रयोगशाळांची समूह असणारी इंडियन सार्स कोव-२ कंसोर्टियम ऑन जेनोमिक्स Indian SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG)संस्था या नव्या व्हेरियंटवर संशोधन करत आहे. यातील विविध जीनोमिक व्हेरियंट जवळपास सर्वच देशात आढळले आहे. यासाठी विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. यातील अनके प्रयोगशाळांमध्ये विदेशी नागरिकांच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांचा अभ्यास केला जात आहे. अधिकतांश राज्यातून तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डबल म्युटेंट व्हेरियंट आढळले आहेत.

महाराष्ट्रातही कोरोनाचे नवे व्हेरियंट, (variants) स्ट्रेन आढळत आहेत. महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452F व्हेरियंट आढळले आहे. हे व्हेरियंटमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून संक्रमित रुग्णांची संख्या पून्हा वाढत आहे. १५ ते २० टक्के चाचण्यांमध्ये नवे व्हेरियंट आढळत आहे. महाराष्ट्रासह केरळमध्येही कोरोनाचे नवे व्हेरियंट आढळत आहेत. केरळमधील १४ जिल्ह्यामधील २०३२ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये N440K हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तर आंध्रप्रदेशातील ३३ टक्के चाचण्यांमध्ये N440K हा व्हेरियंट सापडला आहे. तर तेलंगणामध्येही ५३ टक्के चाचण्यांमध्ये हा व्हेरियंट मिळाला आहे. त्याचप्रमाणे युके, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलियासग १६ विविध देशांमध्येही कोरोनाचा हा नवा व्हेरियंट सापडत आहे. देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधित म्हणजे ४७ हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. यातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!