चिंताजनक! केंद्राची आकडेवारी जारी; महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगासह देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी तसेच आलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असून त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा अनुक्रमे नंबर येतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.
5 States that account for 60% of the total active cases in the country are Maharashtra, Karnataka, Andhra Pradesh, Uttar Pradesh & Tamil Nadu: Secretary, @MoHFW_INDIA #StaySafe #IndiaWillWin @ICMRDELHI pic.twitter.com/RC0t2zBteP
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) September 15, 2020
तसेच केंद्रीय मंत्रालयाने यावेळी माहिती दिली की भारतात १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे ५ हजाराहून कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजार ते ५० हजाराच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी ८.४ असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.