क्राईमधरणगाव

गटशिक्षणाधिकाऱ्यांसह एकाला दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

धरणगाव,जि. जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। धरणगाव गटशिक्षणाधिकारीसह एकाला लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाल सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे (रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर) आणि विभागातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे (रा. गट साधन केंद्र, पंचायत समिती धरणगाव) यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाची मागितली. परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार आज तक्रारदार यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून तुळशीराम सैंदाणे याने २ हजार रूपये घेतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!