भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

लाचखोर पोलिस निरिक्षकाच्या घरातून ६० लाख रुपयांची सोन्याचे बिस्कीटे,व पावणे दोन कोटींचे दस्ताऐवज जप्त

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,दत्तात्रय सखाराम शिंदे, सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड. व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने पो.हवालदार, ३३४ रा. प्लॉट नंबर ५८, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे. तसेच पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील. वय ४५वर्ष. पो.हवा. १६२९. स्थानिक गुन्हे शाखा वर्ग ३. प्लॉट नंबर २५, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे. यांना धुळे एसीबी ने दि.२ एप्रिल रोजी अटक करून गुन्हा दाखल केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

आरोपीतांना दि.२ रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांच्या सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. २, बीड. या राहते घराची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घर झडती घेतली असता घर झडती दरम्यान सुमारे ६० लाख रूपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे व दागीणे तसेच सुमारे ७७ हजार रूपयाचे चांदीचे भांडी व दागिणे जप्त करण्यात आली इतकेच नव्हे तर त्यांचे कुटुंबाचे व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे १ कोटी ७५ लाख रूपयांच्या स्थावर मालमत्तेचे खरेदी खताची दस्ताऐवज सापडले ते ही जप्त करण्यात आले. या गुन्हयाचा पुढील तपास धुळे लाच लुचपत प्रतीबांधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक, श्री. अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती.रूपाली खांडवी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!