मोठी कारवाई : गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून अडीच कोटींचा गुटखा जप्त
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची तस्करी होत असून राज्य भरात गुटख्याची विक्री केली जात आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्याचा अडीच कोटींचा अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून गुटखा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पहिल्या कारवाईत इंदोरकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये शहादामार्गे शिरपूरकडे येणाऱ्या तीन ट्रक पोलिसांनी जप्त केल्या त्यातील देखील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोन्ही कारवाईत शिरपूर पोलिसांनी दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी सुपारी असा मुद्देमाल हस्तगत केल्याने गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.