धक्कादायक ; व्याजाच्या मोबदल्यात सावकारकडून गरोदर महिलेकडे शरीरसुखाची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धुळे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खाजगी सावकारी करणं कायद्यानं गुन्हा आहे. असं असताना सुदधा अनेकजण कायद्या ढाब्यावर बसवून खाजगी सावकारी करतात.गरजू लोकांना वेठीस धरून त्यांना अवाढव्य व्याजदराने पैसे देण्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.अनेक गरजुनी सावकाराचे पैसे देता आले नाही म्हणून खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या सुदधा केल्याची अनेक उदाहरणे असून खाजगी सावकार गरजवंताना मोठे व्याज आकारून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करत असतात.आशा सावकारांवर कायद्याचा वचक राहिलेला दिसून येत नाही.खाजगी सावकाराचे समबंधीत शासकीय यंत्रणेशी लागेबांधे असल्याने ते शिरजोर झाले आहेत,असाच एक धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात घडला.मुद्दल व अवाढव्य व्याजाच्या व्यतिरिक्त महिलेकडून शरीर सुखाचीही मागणी चा प्रकार धुळे जिल्ह्याच्या पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.
फिर्यादी व्यक्तीने आरोपी खाजगी सावकार याचे कडून व्याजाने पैसे घेतले होते,ते पैसे देता आले नसल्याने 25 मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी तरुणाला व त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केली, या मारहाणीत फिर्यादीच्या गरोदर पत्नीच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने बाळाच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. मारहाणीनंतर आारोपी सावकार जितेंद्र बैसाणे, समीर गवळी आणि कल्याण गरूड यांनी फोन करून फिर्यादीच्या गरोदर पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे
खाजगी सावकाराने व्याजाच्या पैशांसाठी तरुण दाम्पत्याला बेदम मारहाण करून नराधम आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यानं व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली .शरीरसुखाच्या मागणीचा हा धक्कादायक प्रकार 6 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होता.हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणानं धुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या बाबत 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.