रावेर-पुनखेडा रस्त्याची दुरावस्था; वाहनधारक त्रस्त
रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर-पुनखेडा हा रस्ता अडीच ते तीन किमीचा असून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे, तसेच रस्त्याने ये-जा करणारे वाहनधारकाना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की येथून जवळ असलेल्या रावेर-पुनखेडा जवळ जवळ अडीच ते तीन किमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने दिवसा तसेच रात्रीही वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागते. ही रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच वाहन धारकांचे होणारे हाल शासन,प्रशासन लक्ष देऊन थांबवतील का? असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना पडलेला आहे.
हा भाग केळी उत्पादकांचा असल्याने केळी भरण्यासाठी ये-जा करणारी वाहने,शेतकरी आणि शेतमजूर व स्कूल बस इतर ये-जा नागरिकांची दिवसभर या रस्त्यावरून वर्दळ सुरूच असते. रस्ता खराब झाला असल्याने या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. शासनाला या रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल का? असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.