भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यास सीबीआय कडून जळगाव मध्ये लाच घेताना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी जळगाव येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधीकाऱ्यास पुणे सीबीआयने २५ हजारांची लाच घेताना अटक केली. सीबीआयच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

वडिलांच्या नावे कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले. मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले. फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी ५० हजारांची लाच मागितली होती. शेवटी तडजोडी अंती २५ हजार देणे ठरले

या संदर्भात तक्रारदार यांनी पुणे सीबीआयकडे तक्रार दिल्याने पुणे सीबीआय कडून सापळा रचण्यात आला. सापळ्या नुसार जळगाव येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधीकारी रमण वामन पवार. वय ५८ वर्ष, रा. शनिपेठ, जळगाव. या अधिकाऱ्याला तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात येऊन कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!