१६ जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येत्या दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्यामहिलाना हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत तक्रारी ,अडचणी, सोडविण्यासाठी पीडित महिलाना न्याय मिळावा. या साठी महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.
त्या नुसार येत्या १६ जून रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थीत राहण्याचे आवाहन माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.