तापी परिसरात देशी – विदेशी – हातभट्टी दारूची बंद च्या दिवशही सर्रास विक्री
तासखेडा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | काल दिनांक १४ सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शासनाकडून मद्य विक्रीकरण्यास बंदी चे आदेश असल्यावर सुद्दा तापी परिसरात या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसून आले. आणि ते ही कुठल्या धाक दडपणा मंध्ये न राहता उघड उघड अवैध देशी विदेशी तसेच हातभट्टी दारूची चढया दराने विक्री करत असल्याने कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि या संधिच सोन सुद्धा अवैध व्यवसायिकांनी करून घेत लुटण्याच काम केले आहे. या संपूर्ण प्रकारा कडे माहिती असुन सुद्दा दारू बंदी खात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
तापी परिसरातील उदळी , तासखेडा व रायपुर या गांवामंध्ये दिवसेंदिवस अवैध देशी विदेशी तसेच हातभट्टी विक्रीचे धंदे जोर धरत आहे. हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय कमि न होता वाढतच आहे. यामुळे तरुणवर्ग हा दारुच्या आहारी जावून मुत्युच्या दारात ओढला जात आहे या दारुमुळे अनेक परिवार उद्धवस्त झाली असून सुद्धा प्रशासनाला याच्याशी काही एक घेणे देणे नाही. वेळेवर आपला हप्ता पोहचतोय त्यातच खात खुश असल्याचं दिसत आहे.
तापी परिसरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची खूप मेहरनजर दिसत आहे. तापी परिसरात अवैध देशी विदेशी हातभट्टी दारू विक्री बंद न होता त्या उलट जोमानं सुरू आहे.
नेमके अवैध व्यवसाय वाढीमागे कारण तरी काय असावे ? कायद्याचा धाक संपला की काय ? असे एक ना अनेक शंका परिसरातील ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तरी कुठे? तापी परिसरावर जास्तच मेहरबान आहे की काय ? म्हणुनच अवैध दारू विक्री व्यवसायिक बिनधास्तपणे कुणाचाही धाक न बाळगता भर वस्तीत आपली विष विक्रीची दुकान खोलून बसली आहेत.
आणि या विषामुळे तरुण हा स्मशाना कडे वाटचाल करित आहे. या तरुण पिढीच्या जिवापेक्षा खिशात पडणाऱ्या पैश्यांचे ओझे जास्त की काय ? असे म्हणणे काहीही चुकीचे ठरणार नाही. का साहेबांना सुद्धा ठरलेल्या तारखेला अवैध दारू विक्रेत्याकडून आपली भेटवस्तू मिळत असावी म्हणून साहेब सुद्धा तापी परिसरात सुरू असलेले अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष्य करीत आहेत की काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. असेच जर सुरु राहीले तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाव लोकांना विसर पडायला वेळ लागणार नाही . संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागा सह पोलिस प्रशासनाने या कडे लक्ष देऊन भरकटणाऱ्या तरुण पिढीच्या संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवावे अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांकडून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा