क्राईमचोपडाजळगाव

दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत दोघींवर लैंगिक अत्याचार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दोन अल्पवयीन मुलींना दोघे तरुणांनी फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.ही घटना चोपडा तालुक्यातील अडावद येथे घडली. अडावद पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

एकाच गावात राहणाऱ्या दोघी अल्पवयीन मुलींना त्याच गावात राहणाऱ्या दोन मुलांनी फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले असल्याचा गुन्हा पोलिस स्टेशनला आधीच दाखल करण्यात आला असून त्यात आणखी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी दोघं आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यात एक विधी संघर्षीत १७ वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या १९ वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, दोन्ही पिडीत मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपिंनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात अत्याराचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजु थोरात, पोहेकॉ संजय धनगर, सतीश भोई हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!