भुसावळ मध्ये “डबल मर्डर” मा.नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे याची गोळी मारून हत्या
भुसावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ मध्ये गुन्हेगारी श्रेत्रात शांतता होती. परंतु रात्री झालेल्या घटनेने गुन्हेगारी श्रेत्राने पुन्हा डोके वर काढले आहे. पुन्हा एकदा भुसावळ गोळीबाराने हादरले. रात्री झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांची हत्या झाल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात शांतता राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा भुसावळ गोळीबाराने हादरले असून यात दोघांचा बळी गेला.रात्री दहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात गोळीबार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही जण चारचाकीतून राष्ट्रीय महामार्गाकडून जुना सातारा मार्गाने शहरात येत असतांना हल्लेखोरांनी त्यांना अडवून गोळीबार करून पलायन केले.
सदरची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली, याबाबतची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या दोघांना पहिल्यांदा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आणि नंतर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
संतोष बारसे हे माजी नगरसेवक असून त्यांच्या सौभाग्यवती सोनी बारसे यांनी आधी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे वडील मोहन बारसे यांचा देखील आधी खून झाला होता. यानंतर आता संतोष बारसे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यात त्यांचा मृत्यू यात त्यांचा झाला.
त्याच प्रमाणे सुनील राखुंडे हे देखील सामाजिक कार्यकर्ते असून अल्प काळात त्यांनी सामाजिक कार्यात नाव मिळवले होते.
दरम्यान, संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी तात्काल घटनास्थळी धाव घेतली. यानंतर समर्थक मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल झाले. पोलीस अधिक्षक एम. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरिक्षक गजानन पडघन यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.