पाडळसे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पाडळसे, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती यावल तालुक्यातील पाडळसे येथे मोठ्या उत्साहातn सामाजिक ऐक्याने साजरी करण्यात आली. गावातील विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम पार पडले.
13 एप्रिलच्या मध्यरात्री, म्हणजेच 14 एप्रिलच्या पहाटे 12 वाजता, बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जयंतीचा शुभारंभ झाला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फैजपूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. निरज बोकील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाईटींगने सजावट केली. तसेच, माता रमाई,आंबेडकर चौकात आणि नाग भूमी बुद्ध विहारात देखील आकर्षक लाईटींगसह निळे झेंडे-पताका लावण्यात आले, ज्यामुळे सजावट आणि उत्साहात अधिक भर पडली.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. गुणवंती पाटील, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस पाटील सुरेश खैरनार, तर आद्यकवी महर्षी वाल्मिकी नगर येथील आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या सभागृहात उपसरपंच अलका सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तायडे, तर नाग भूमी बुद्ध विहार येथे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश अडकमोल व उपाध्यक्ष सुनील तायडे यांच्या हस्ते पूजन सोहळा पार पडला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ:
ग्रामविकास अधिकारी सी. एच. वाघमारे, माजी सरपंच खेमचंद कोळी, मा. सरपंच ज्ञानेश्वर तायडे, सिताराम कोळी, शरद तायडे, विलास तायडे, युवराज कोळी, मुकुंदा कोळी, सागर तायडे, अनिल चौधरी, प्रदीप चौधरी, राजेश तायडे,दिनेश मोरे,नामदेव कोळी, किरण तायडे, सुरेखा कोळी, चिंधू कोळी, पोपट भोई, उज्वला पाटील, जयंत चौधरी, पल्लवी तायडे, कविता कोळी, कुणाल तायडे, तुषार भोई, संतोष भोई, समाधान कोळी, लखन तायडे, शुभम तायडे, मयूर तायडे, विठ्ठल कोळी,राहुल कोळी, धीरज माळी, हेमंत कोळी, मनोज सपकाळे, हर्षल वाघ, भीमराव नरवाडे, प्रविण तायडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमातून गावामध्ये सामाजिक सलोखा, समता व बंधुभाव वृद्धिंगत होण्यास मदत झाली. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत संविधानिक मूल्यांचे स्मरण करण्यात आले. संपूर्ण गावाने एकत्र येत ही जयंती उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा