सावदा येथे कै. नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंती प्रित्यर्थ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्री आ . गं .हायस्कूल व श्री ना .गो . पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा तसेच पी .एम . श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा व पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कै . नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीप्रित्यर्थ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
लक्ष्मी विष्णू ट्रस्टच्या माध्यमातून कै. श्री. वसंतराव विष्णू पाटील,कै.श्री.रविंद्र विष्णू पाटील,कै.श्री.सुधीर विष्णू पाटील या तीन दानशूर दात्यांनी एक लाख रुपये एवढी रक्कम दोघ शाळांमध्ये अनामत रक्कम ठेवून त्या अनामत रकमेच्या वर्षभराच्या आलेल्या व्याजातून या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नानासाहेबांच्या जयंती प्रित्यर्थ घेण्यात येतो. याही वर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नानासाहेबांच्या प्रतिमेस मा श्री मनोजकुमार पाटील व मा.सौ. वैशाली पाटील या उभयतांनी पुष्पहार अर्पण करून झाले. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय
श्री . पी.जी . भालेराव सर हे होते व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री . मनोजकुमार वसंतराव पाटील , (अध्यक्ष सहकारी औद्योगिक वसाहत सावदा फैजपूर परिसर) व मा . सौ . वैशाली मनोजकुमार पाटील (माजी व्हाईस चेअरमन , श्री लक्ष्मी सहकारी क्रेडिट सोसायटी , फैजपूर) हे उपस्थित होते . श्री मनोज पाटील व सौ वैशाली मनोज कुमार पाटील यांच्या हस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य श्री पी जी भालेराव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये या दानशूर पाटील परिवाराचे शिक्षणाप्रती असलेले प्रेम याप्रति कृतज्ञता व्यक्त केली . श्री एस एम महाजन सर यांनी नानासाहेबांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला . याप्रसंगी पी.एम .श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पालता ठोंबरे मॅडम ,त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष तेली , उपाध्यक्ष सौ शितल बेंडाळे मॅडम व दोघं शाळांचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद , लाभार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर समारंभाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार कलाध्यापक श्री नंदू पाटील यांनी केले .

