भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मविआ सरकार धोक्यात ! शिंदे गट भाजपला समर्थन करणार : राज्यपालांकडे पत्र देणार !

गुवाहाटी, वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेत दोन गट पडल्याच दिसतंय. तर यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातंय. एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होणार असून ते आपल्या गटाचा भाजपला पाठींबा असल्याचे पत्र राज्यपालांना देणार आजच ठाकरे सरकार पडण्याची शक्यता बळावली आहे. तर विद्यमान राज्य सरकारचे काऊंट डाऊन सुरू झाल्याचं बोललं जातं आहे.

आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंचं बंड हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातंय. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही बंडखोर आमदाराने बंडखोरी केली नाही, असं वक्तव्य करत गर्व से कहो हम हिंदू है म्हणत बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सूरत विमानतळावरून गुवाहाटीमध्ये पोहचले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!