ब्रेकिंग : तब्बल तीन कोटींची रोकडने भरलेली व्हॅन निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून जप्त
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरात सुरुवात झालेली आहे. आपला उमेदवार कसा निवडून येईल या करिता सर्वच पक्ष भर देत आहेत.सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत.
त्यातच एक मोठी व धक्कादायक बातमी मुंबईतील भांडूपमधून समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला नाकाबंदीदरम्यान पैशाने भरलेली व्हॅन आढळली. त्यानंतर भांडूप पोलिसांनी व्हॅनमधील दोघांसह तब्बल तीन कोटींची रोकड ताब्यात घेतली आहे. दरम्यान भांडूप पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळवले आहे.