जळगावमहाराष्ट्र

सोनं, चांदी झाले स्वस्त, ७४ हजारापर्यंत गेलेलं सोन आता इतक्या रुपयांनी झालं स्वस्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. ऐन लग्नसराई च्या दिवसात सोन्याचे भाव वाढल्यामुळे सामान्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. परंतु आता सोन्याचे दार वाढल्या नंतर सोन्याचे दर कमी होत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून सोनं प्रति दहा ग्रॅम २५०० रुपयांनी कमी झालं आहे. त्यामुळे आता सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा दर कमी झाला. चांदीचा दर ही कमी झाला आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर प्रतिकिलो ८२,५०० रुपये होता. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात कमी होत आहे. १६ एप्रिल रोजी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला ७४ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र सध्या याच सोन्याचा दर हा ७१४८६ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. पाच जूनच्या वायद्यासाठी हा सोन्याचा दर आहे.

चांदीच्या दरात काय बदल झाला?
सोन्यासह चांदीच्या दरातही गेल्या दहा दिवसांत घट झाली आहे, आज एमसीएक्सवर चांदीचा दर ८२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आहे. म्हणजेच चांदीचा दरही प्रतिकिलो साधारण २५०० रुपयांनी कमी झाला आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घट झाली आहे.

का कमी होतोय सोन्याचा दर?
काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती. इंधनाचा दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच काळात सोनंही चांगलंच महागलं होतं. दोन्ही देशांतील या तणावात सोन्याचा दर ७४ हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढला होता. कालानंतराने इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाची शक्यता कमी होत गेली, परिणामी सोन्याचा दरही कमी होत गेला. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता सोन्याचा दर ७० हजार रुपये प्रति ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो. सोने आणि चांदीचा दर असाच कमी झाला तर, लग्नसराईत सोने धातूची खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!