भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराजकीय

भालोद ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रतिभा कुंभार यांची निवड

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील भालोद येथील ग्रामपंचायत मध्ये भाजपा प्रणित ग्रामविकास पॅनल ची एक हाती सत्ता आली आहेत त्यामध्ये ठरल्याप्रमाणे उपसरपंच पद एक वर्ष देण्यात येते विद्यमान उपसरपंच लीना नेहेते यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला त्यांच्या जागी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व सरपंच प्रदीप कोळी यांच्या संमतीने भालोद गावातील कुंभार समाजातील महिला प्रतिभा कुंभार यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच भालोद परिसरात कुंभार समाजातील महिलेला ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले.

भालोद तेथे नुकतीच ग्रामपंचायत ची मासिक सभा सरपंच प्रदीप श्रीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये उपसरपंच म्हणून प्रतिभा कुंभार यांची निवड करण्यात आली या निवळीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गणेश नेहेते, नारायण चौधरी आदींनी अभिनंदन केले याप्रसंगी सरपंच प्रदीप कोळी ग्रामविकास अधिकारी बी.के. पारधी ग्रामपंचायत सदस्य लीना नेहेते, जाबीर खान, सचिन भालेराव, मनोज जावळे, अमोल महाजन, नंदा पाटील, विद्या चौधरी, वैशाली झांबरे. व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!