मोठी बातमी : राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदाच्या निवडणूकाना स्थगिती !
मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती देत पुढे ढकलण्यात आले असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहे.
राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात नगरपालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होऊन १९ रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आली होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने यांनी जीआर काढून नगरपालिका निवडणुका स्थगित केल्या असल्याचे पत्रक जारी केले आहे.
राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीचा घोषित केलेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज एका पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आयोगाने भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय या सर्व ठिकाणी लागू करण्यात आलेली आचारसंहिता देखील मागे घेण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.