भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : राज्यात १२ जिल्हापरिषदां व १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा,५ फेब्रुवारीला मतदान

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या राज्यात २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. प्रचार शिगेलो पोहोचला असून १५ जानेवारी रोजी मतदान होईल तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, आता या निवडणुकीची राज्यभरात चर्चा असताना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यात आता एकूण १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता महापालिकेची निवडणूक संपताच राज्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

कोणत्या आहे १२ जिल्हापरिषद

कोकण विभाग– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

संभाजीनगर विभाग – संभाजीनगर,परभणी, धाराशीव व लातूर

राज्यात २५ हजार ४८२ मतदान केंद्रे
या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायचे आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. इच्छुकांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच ज्या ठिकाणी जारा राखीव आहेत, तिथे उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल. राज्यात २५ हजार ४८२ मतदान केंद्रे आहेत. ईव्हीएमच्या मदतीने ही निवडणूक होईल. या मतदानासाठी ५५ हजार कंट्रोल युनिट, १ लाख १० हजार बॅलेट युनिट, २५ हजार ४८२ मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय अशी व्यवस्था केलेली असेल. काही पिंक मतदान केंद्र असतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!