जळगाव जिल्ह्यातील आधी शिपाई नंतर ग्रामसेवक यांना लाच घेताना अटक
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l फेरफार करून मालमत्तेवर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी करणारा तालुक्यातील राजूरा ता. मुक्ताईनगर. येथील ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके वय ३४.वर्ष व्यवसाय नोकरी , ग्रामसेवक राजुरा ता. मुक्ताईनगर जि.जळगांव , वर्ग 3 व सचिन अशोक भोलांकर वय २३ वर्ष व्यवसाय ग्रामपंचायत शिपाई, राजुरा ता . मुक्ताईनगर जि. जळगांव वर्ग 4 या ग्रामपंचायतीचा शिपाई दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली.
या संदर्भातील माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुक्यातील राजूरा येथील ४२ वर्षीय व्यक्तीची मालमत्ता घर व प्लॉट असून ही मालमत्ता त्याच्या आईच्या नावावर होती. तेथून आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज दाखल केला होता.फेरफार करून या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी ११ हजार रूपयांच्या लाचेची मागणी १५ मे रोजी केली होती. या संदर्भात त्यांनी जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.
दरम्यान, ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तळजोडी अंती ११ हजार रूपया वरून सहा हजार रुपये देणे ठरले असता ग्रामसेवक यांनी शिपयाजवळ देण्याचे सांगितले शेवटी ६ हजार रूपयांची लाच स्वीकारताना आधी शिपाई सचिन भोलाणकर याला तात्काळ एसीबीच्या पथकाने अटक केली.त्या नंतर ग्रामसेवक मनोज घोडके याला अटक केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरिक्षक अमोल वालझडे, फौजदार दिनेशसिंग पाटील यांच्यासह बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, शैला धनगर, रवींद्र घुगे, सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली