भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात निवडणूक कालावधीत मतदान संपे पर्यंत ४८ तास मद्यविक्री बंद

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासापासून म्हणजेच ११ मे २०२४ रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १२ मे २०२४ आणि १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!