ग्राहकांना आर्थिक फटका ! मोबाईल रिचार्ज महागणार! किती रुपयांनी वाढणार, केव्हा पासून?
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मोबाईल धारकांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा गरजेचा आणि जीवनावश्यक बनला आहे, आणि मोबाईल म्हंटल कि त्याला रिचार्ज हा आलाच …. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन- आयडियाच्या रिचार्ज आता महागणार आहे.. या तिन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये भली मोठी वाढ करणार असल्याच सांगितलं जात आहे.
जून महिन्यापासून रिचार्ज वाढणार?
मिळालेल्या माहितीनुसार,रिचार्ज प्लॅनच्या किमतीत जून पर्यंत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कारण उन्हाळा असल्याने कंपन्यांची ऑपरेटिंग सुमारे २० ते २४ टक्क्यांनी वाढला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने डिझेल जनसेट चालू असल्याने ऑपरेशनचा खर्च वाढला आहे. हा सर्व खर्च टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांकडूनच वसूल करणार हे नक्की.
सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उष्णतेच्या लाटेमुळे दूरसंचार कंपन्यांचा खर्च वाढला आहे. यावेळी बेस स्टेशन सतत चालू ठेवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एअर कंडिशनिंगचा (AC) जास्त वापर करावा लागत आहे. वापर जास्त असल्याने त्याला अतिरिक्त खर्च सुद्धा येत आहे. हाच खर्च भरून काढण्यासाठी जून महिन्यापासून मोबाईल रिचार्जच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आधीच महागाईची झळ बसत असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आवश्यक असलेला मोबाईल रिचार्ज सुद्धा वाढला तर ग्राहकांना आणखी आर्थिक फटका बसणार हे नक्की.


