भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावधरणगाव

अतिक्रमण भोवले, सरपंच अपात्र

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | सरकारी जागेवर अतिक्रमण करणे सरपंचांना खूपच महागात पडले. जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु. येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच संगीताबाई लोटन पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या संदर्भात नाशिकचे अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु. येथील ग्रामपंचातीच्या प्रभारी सरपंच संगीताबाई लोटन पाटील यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार संदीप आसाराम पाटील यांनी नाशिकचे अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती. त्यानंतर संदीप पाटील व प्रभारी सरपंच संगीताबाई पाटील या दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. यात सरकारी  जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने  संगीताबाई पाटील यांना अपात्र घोषित करण्यात आले.याप्रकरणी अँड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.

या आधीचे सरपंच जात वैधता प्रमाणपत्र अभावी अपात्र झाले होते. त्यांच्या जागी उपसरपंच संगीताबाई पाटील यांची प्रभारी सरपंचपदी यांची नियुक्ती केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!