दुचाकी – स्कूल बसच्या अपघातात मुलगा ठार, आई गंभीर जखमी
पाल, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील पाल जवळील मोरव्हाल फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात मुलगा ठार झाला तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वनसिंग सदू भिल (वय ३४) रा. हरण्याकुंड, जि. खरगोन, याचा मृत्यू झाला तर सोनीबाई सदू भिल (वय ४८) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मध्यप्रदेशहून पालकडे येणारी दुचाकी, क्रमांक एम. पी. १० जे. ११३८ आणि एक स्कूल बस यांच्यात हा अपघात झाला. या प्रकरणी स्कुल बस चालक संतोष भुरा राठोड, रा. गुलाबवाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरुन वनसिंग आणि सोनाबाई यांना उपचारासाठी रावेरला आणताना वनसिंगचा मृत्यू झाला.

