भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिकसामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे पर्यावरण पूरक धुलीवंदन व होळी उत्साहात साजरी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |  भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,काहूरखेडे येथे पर्यावरण पूरक होळी व धुलीवंदन उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत नैसर्गिक रंगांचा वापर करून सण साजरा करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी झाडांची तोड न करता, कमी लाकूड वापरून होळी प्रज्वलित करावी तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले. सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपशिक्षक समाधान जाधव यांनी कृत्रिम रंगांमुळे त्वचा व डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रासायनिक रंगांऐवजी फुलांपासून, हळदीपासून व इतर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग वापरण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे आवाहन त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्यांनी व नैसर्गिक रंगांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून शाळेच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!