भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

सावदा शहरात मुदतबाह्य मॅलेथिऑन कीटकनाशक फवारणी? शहरात चर्चेला उधाण?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरात मुदतबाह्य कीटकनाशक (MALATHION 50% EC Insecticide MALLUX 50 ) फवारणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कीटकनाशक ची मुदत एक्सपायरी झालेली असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात शहरभर मोठी चर्चा सुरू आहे.या बाबत पालिकेने चौकशी करावी. व ठेकेदाराला कळ्या यादीत टाकावे.

सावदा शहरात नगरपालिकेकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात येते. मात्र ही फवारणी कित्येक महिन्यातून म्हणा किंवा वर्षातून कधीतरी केली जाते. कागदेपत्री काय दाखविले जाते. हे त्यांनाच माहिती. मात्र दिनाक १६ जानेवारी रोजी असे तीन चार दिवस शहरात मॅलेथिऑन नामक कीटकनाशक फवारणी करण्यात आली. मात्र हे फवरणी करण्यात आलेले मॅलेथिऑन नामक (मल्लक्स 50) कीटकनाशक मुदत बाह्य (मुदत संपलेले) असताना फवारणी करण्यात आले. त्याची उत्पादित तारीख (म्यानुफक्चारिंग डेट) २० /१०/२०२१ तर एक्सपायरी डेट १९/१०/२०२३ असताना एक्सपायरी संपली असताना त्याची फवारणी सावदा शहरात १६ जानेवारी २०२६ रोजी असे तीन चार दिवस करण्यात आली..

या संदर्भात सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचेही संपर्क साधला असता” पुरावे असल्यास त्याची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करू व त्यांना पुन्हा फवारणी करायला लाऊ” असे सांगितले. आता मात्र नक्की काय? याची मोठी चर्चा असून, चौकशी मध्ये समोर येईलच.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!