भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जिल्हा परिषदेचे आणखी ५ कर्मचारी निलंबित, निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १३

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जळगाव जिल्हा परिषदेच्या ५ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पाचही कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवार दि २१ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे. या पूर्वी जिल्हापरिषदेच्या ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने त्यानुसार भास्कर रामदास चिमणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यावल, विनोद शांताराम बोधरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती चोपडा, शांताराम उखरडू तायडे, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यावल, दिनेश लक्ष्मण नन्नवरे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग, पारसमणी काशीराम मोरे, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती अमळनेर या पाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई बुधवार दि २१ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. या पूर्वी देखील, …भालचंद्र नारायण पवार, आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव, छाया घनश्याम भोळे, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड, संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव व गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव, तर चाळीसगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी नारायण सुकदेव मोरे ,तसेच

पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांनी बोगस दिव्यांग प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेऊन सीईओंनी त्यांचे निलंबन केले असून सोमवार दि. १२ रोजी आता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बोदवडचे वरिष्ठ सहाय्यक शंकर वसंतराव वाघमारे या आठ कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या १३ इतकी झाली आहे

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची uid कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्य दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. ६८३ पैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतर कारवाई होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!