महाराष्ट्र

राज्यात अति मुसळधार पाऊस,या जिह्यात गारपिटीचा इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या हवामानात मोठे बदल झाले असून आज मुंबई, ठाणे, उपनगरासह काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील, पुढचे तीन दिवस ढगाळ हवामान असेल. नाशिक, घाटमाथा, परिसरात देखील हीच परिस्थिती असेल.

अंदमान निकोबार बटांपासून पुढे सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढला आहे. पुढच्या चार दिवसांत अंदमानकडे मान्सून दाखल होण्याची शक्यता असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि धाराशिवमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

अहिल्यानगर, पुणे, घाटपरिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील २४ तासांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळचे काही तास वगळता दिवसभर शहरातील वातावरण अंशत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान अवकाळी पावसाने राज्यात कहर केला आहे. कोल्हापूर, मराठवाडा, नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिला असून अवकाळी पावसाच्या थैमानान राज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!