भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयरावेर

भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी दिपाली चौधरी झोपे

Monday To Monday NewsNetwork।

फैजपुर (प्रतिनिधी)। फैजपूर येथील भारतीय जनता पार्टी च्या सक्रीय कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांची भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

दादर येथील वसंत स्मृती या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजित ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री ॲड.आशिष शेलार,प्रतापगड उ.प्र.खासदार संगम लाल गुप्ता, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.आ.योगेश आण्णा टिळेकर, ओबीसी मोर्चा महिला प्रदेश संपर्क प्रमुख श्रीमती वनिता ताई लोंढे यांच्या हस्ते सौ.दिपाली चौधरी यांना नियुक्ती पत्र देऊन भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.

    सौ.दिपाली चौधरी यांच्या या नियुक्ती बद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री गिरीश महाजन,खा.रक्षाताई खडसे,खा.उन्मेष पाटील,सहसंघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ,आ.मंगेश चव्हाण,आ.संजय सावकारे, ओबीसी जळगाव महानगराध्यक्ष जयेश भावसार,भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष फारुक शेख, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील यांच्या सह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!