भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडायावल

एमके स्पोर्ट्स आयोजित एमके स्पोर्ट्स ट्रॉफी चा डीएनसीसी फैजपुर संघ अंतिम विजेता

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा । जळगांव एमके स्पोर्ट्स क्रीडांगणावर झालेल्या एमके ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात डी एन सी सी फैजपूर संघाने डीएसए भुसावळ संघावर 4 गडी राखून मात केली.
डी एन सी सी फैजपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, डीएसए भुसावळ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सात गडी बाद 160 धावा केल्या. त्यात सिद्धार्थ नक्का ने 46 धावा केल्या तर चंदन वाणीने 26 धावा केल्या,
प्रत्युत्तरात सिद्धेश गावंडे 83 तर आनंद जगताप यांनी 48 धावा करत डी एन सी सी फैजपूर संघाला एमके ट्रॉफी चे विजेतेपद मिळवून दिलं.


या सामन्याचा सामनावीर तडाखेबंद 83 धावांची खेळी करणारा सिद्धेश गावंडे ठरला.धनाजी नाना महाविद्यालय क्रिकेट क्लब संघाकडून धनंजय शिरीषदादा चौधरी, प्रा. शिवाजी मगर, प्रशांत ढोले, सिध्देश गावंडे,वकार शेख, ऋतवीक, अक्षय, तन्जील खान, दिपक जगताप, अनिकेत मोरे, मोहन खान, लोकेश देशमुख, आनंद जगताप, मनिष बोरसे, आरशद पिंजारी, सौरभ, गौरव या सर्व खेळाडूने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व रावेर-यावल क्षेत्राचे आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर, सर्व उपप्राचार्य, जिमखाना समिती चेअरमन डॉ सतिश चौधरी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ गोविंद मारतळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी पद्माकर पाटील, सौरभ कोठारे व सचिन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!