भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

बामणोद येथील एकविरा माता मंदिरातून चांदीचे दागिने व रोकडची चोरी

फैजपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील बामणोद येथील गावाचे बाहेरील फैजपूर रोडवरील रस्त्यावरीलच एकविरा माता मंदिरातून चांदीचे मुकुट व चांदीचे छत्र , दानपेटीत जमा झालेली रक्कम चोरी झाल्याची माहिती समोर आली.

बामणोद-फैजपूर रस्त्यावरील बामणोद गावा बाहेरील एकविरा माता मंदिराचे स्टिलचे गेटचे कुलुप तोडून लाकडी दरवाजा आत ढकलून मंदिराच्या गाभा-यात चोरट्याने १४ मे २०२२ रोजी रात्री ९ ते दि. १५ मे २०२२ रोजी सकाळी ६ वाजेचे दरम्यान प्रवेश करून १५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे २५० ग्रॅम वजनाचे मुकुट, १५ हजार ३०० रुपये किंमतीचे चांदीचे २८० ग्रॅम वजनाचे छत्र त्यास घंगरू असलेले, एक हजार रुपये रोख लोखंडी दान पेटीत दान म्हणून जमा झालेली अंदाजी रक्कम, असा एकूण ३१ हजार ३०० रुपयांचा माल चोरून नेल्याची तक्रार रमेश गणपत सोनवणे,वय ५२ रा. बामणोद ता. यावल,यांनी
फैजपूर पोलिसस्टेशनला केल्याने या बाबत फैजपूर पोलीस पोलिसस्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!