Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे वाहन जप्त !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथे पोलिसांनी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणार्‍या गुरांनी भरलेले छोटा हाती वाहन नाकाबंदीच्या दम्यान जप्त केले असून सदरील वाहन चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत अधिक असे, येथील छत्री चौकात बुधवारी पोलिसांची नाकाबंदीवर असताना फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे हे वाहनांची तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीचे छोटा हत्ती वाहनात गोवंश जातीचे ४ गुरे त्यात २ गाई व २ वासरू अशी अवैधरित्या घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना पाहताच वाहनचालकाने वाहन सोडून पळ काढला पोलिसांनी सदरचे वाहन व त्यातील चारही गुरे ताब्यात घेतले असून आमोदा येथील गोशाळेत गुरांना सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आले तर वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी वाहन चालक रईस खान हमीदार खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, हे.कॉ. उमेश चौधरी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!