भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पूर्णानंद महाराजचा पूर्णप्रताप.

Monday To Monday NewsNetwork।

फैजपूर(प्रतिनिधी)। स्वयंघोषित महाराज म्हणून व फैजपूर येथील आशिष सराफ नगर येथे वास्तव्यास असलेले तथा जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथील मुळ रहिवासी असलेल्या पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज यांनी दिनांक १८ मे रोजी दुपारी दीड वाजता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली.

या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणा येथील रहिवासी हल्ली मुक्काम लक्ष्मीनगर फैजपूर येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीस पूर्णानंद महाराज यांनी मिठी मारून तिच्या मनाविरुद्ध नकोसा वाटणारा स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने विनयभंग केला. याबाबत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन काल रात्री दीड वाजता फैजपूर पोलिसात सी सी टी एन एस गुरनं.- ६३/२०२१ भादवि कलम ३५४ (अ), ४५२ पोस्को कायदा कलम -८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथा प्रवचन करणाऱ्या तथा कोणत्याही संप्रदाय, धार्मिक परंपरेशी अधिकृत संबंध नसलेल्या स्वयंघोषित पूर्णानंद महाराजांचा हा चौथा प्रताप असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्णानंदांनी याआधी तालुक्यातील दोन वेगवेगळया ठिकाणी मुलींशी अशाच प्रकारचे अश्लील चाळे केल्याने त्यांना चोप देखील बसला होता. त्यावेळेला प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने त्याला वाचवण्यात आले होते.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी पूर्णानंदांनी येवला येथे प्रवचन केले होते. त्या दरम्यान तेथील मुलीसोबत प्रेम विवाह केला. या महाराजाची फैजपुरात यावल रोड वर गो शाळा आहे येथे अनेक महिला गो पूजनासाठी या गो शाळेत येत असतात.या महाराज चे घरात सुशील पत्नी असूनही पूर्णानंद महाराजांचे असे चाळे सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात होता. मात्र काल झालेल्या घटनेने त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांना कोठडीत ठेवले आहे. आज त्यांना भुसावल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!