क्राईमनंदुरबार

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 5 वर्षांच्या चिमुरडीवर 40 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार

Monday To Monday NewsNetwork।नंदुरबार(प्रतिनिधी)।नंदुरबार मध्ये एका 40 वर्षीय नराधमाने 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. ही घटना शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात घडली या प्रकरणी पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे गैरकृत्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातल्या जुनी सिंधी कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणारी 5 वर्षीय चिमुरडी आरोपीच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आली होती.आरोपीच्या किराणा दुकानात पीडित मुलगी चॉकलेट घेण्यासाठी गेली असता तिला घरात बोलावून आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षाणी याने तिच्या सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलगी घाबरून तिथून पळत घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत कुटुंबातील सदस्यांना सांगितली. आपल्या चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांना एकच हादरा बसला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!