बोगस शालार्थ आयडी घोटाळा ; शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीं सह ९ जणांना अटक,चोपडा,धुळे येथील आरोपींचा समावेश
वरिष्ठ पोलीस अधिकारी निलंबित
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क. | शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना बुधवार दि.३ डिसेंबर रोजी अटक केली. पोलीस तपासात उपासणी दोषी आढळून आले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, गुरुवारी उपासनी यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आता पर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींचे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटकसत्र सुरू आहे. संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस शालार्थ आयडी तयार केले. या आयडीच्या आधारे शेकडो तरुणांना नोकऱ्या देऊन अनेक संस्थाचालकांनी कोट्यवधी रुपये उकळले आणि मागील तारखांचे कोट्यवधी रुपये पगार काढले. प्रकार उघडकीस आले आहे.
याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला. या पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करून आवक-जावक रजिस्टरमध्ये हेराफेरी केली. परिणामी, गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. धुळे), नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा, जि. जळगाव), दत्तात्रय दयाराम पाटील यांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस इतर संशयितांचा शोध आहेत. शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणात स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षणसंस्थांच्या भेटी देत ऑन द स्पॉट भेटी देत संस्थाचलाकांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

