शालार्थ आय डी घोटाळा : मोठे अधिकारी, संस्थाचालक व मुख्याध्यापक रडारवर
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शालार्थ आय डी घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा कडून अटकसत्र सुरू आहे. यात मोठे अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक रडारवर आहेत. या प्रकरणी घोटाळ्यातील आरोपी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याना पोलिसांनी अटक केली असून यासह यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात जळगाव ,धुळे जिल्ह्यातील आरोपींचा समावेश असून एक एक आरोपी ताब्यात घेण्यात येत आहे. आणखीही काही मोठे अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक पकडले जाण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी संच मान्यतेपेक्षा कितीतरी जादा पदे भरली जाऊन त्यांचे शालार्थ आय डी बनावट तयार करून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. तसेच मागील तारकांचे कोट्यवधीं रुपयांचे पगारही काढले आहेत. यात एक एक आरोपी पकडले जात असून पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी इतरांचीही नावे उघड करीत आहेत. या प्रकरणात आरोपींशी संगनमत करून आवक जावक रजिस्टर मध्ये हेराफेरी केल्या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील संस्था चालक, मुख्याध्यापक, अधिकारी रडारवर
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून आता पर्यंत पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून त्यात जळगाव जिल्ह्यातील निलेश निंबा पाटील (रा.चिंचोली, ता. चोपडा ) मनोज रामचंद्र पाटील धुळे दत्तात्रय दयाराम पाटील यांचा समावेश आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींचे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटकसत्र सुरू आहे. संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस शालार्थ आयडी तयार केले. या आयडीच्या आधारे शेकडो तरुणांना नोकऱ्या देऊन अनेक संस्थाचालकांनी कोट्यवधी रुपये उकळले आणि मागील तारखांचे कोट्यवधी रुपये पगार काढले. प्रकार उघडकीस आले
निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सेवा काळात आणि निवृत्तीनंतर ही स्वाक्षरी करून बनावट शालार्थ आय डी घोटाळ्यात समावेश असल्याचे पुरावे पोलिसांना हाती लागल्याने त्यांना ३ रोजी संध्याकाळी अटक करण्यात आली. ४ रोजी त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ पर्यंत कोठडी सुनावली आहे.
या घोटाळ्यात जस जसे नवीन आरोपी अटक केले जात आहेत, तशी भ्रष्टाचाराची साखळी हळूहळू उलगडत जात आहे. यात आणखी काही मोठे अधिकारी मुख्याध्यापक आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे काही संस्थाचालकांमध्ये घबराहट पोसारली असून शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणात स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षणसंस्थांच्या भेटी देत ऑन द स्पॉट भेटी देत संस्थाचलाकांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
