नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव. येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “शिक्षणात कधीही खंड आणू नका. आई-वडिलांचे, आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, व्यवसायिक बना, जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा. मात्र सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शेवटी एक चांगला माणूस बना,” अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती हर्षाली दीपक कोल्हे यांनी प्रभावीपणे पार पाडले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.
श्रीमती सपना टोके व श्रीमती स्वप्न गारसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली, तर आभार प्रदर्शन श्रीमती भावना प्रल्हाद चौधरी यांनी केले.
शाळेतील शिक्षकवृंद, श्रीमती कविता नेमाडे, श्रीमती कविता पाटील, श्रीमती विनिता नारखेडे व मिलिंद गारसे. यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, चंद्रकांत लक्ष्मण कुरकुरे, श्रीमती सरला किरंगे, श्रीमती शितल राणे व श्रीमती स्वाती भंगाळे — यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने सुंदर शुभेच्छापत्र व गोड खाऊ देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि संपूर्ण समारंभ अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाचा भावनिक आणि उत्साहपूर्ण समारोप झाला.