भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिकसामाजिक

विरोदा शाळेत बदली झालेल्या शिक्षकांना निरोप ; विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | विरोदा येथील शाळेत बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यात येऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा दिला. ग्रामस्थांनी कृतज्ञता केली व्यक्त करण्यात आला.

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विरोदा येथील शिक्षक गिरीश महाजन, यांची हिंगोणा येथे बदली झाली. याबद्दल त्यांना निरोप देताना ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. तर मारुळ शाळेतील शिक्षिका श्रीमती.संगीता गाजरे यांचे स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शिक्षकांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामस्थ म्हणाले की, शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली. शिक्षकांनी समर्पित भावनेने कर्तव्य बजावल्याचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा झाला. आज गावातील विद्यार्थी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. येत्या काळातही शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. शिक्षकांनी त्यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी सरपंच जीवन तायडे ,उपसरपंच विनोद झाल्टे,सदस्य पंकज बऱ्हाटे,,ग्रामसेवक शिवाजी सोनवणे , ग्राम रोजगार सेवक वसीम पिंजारी ,अमोल वारके,सतीश बऱ्हाटे,नितीन चौधरी, सतीश चौधरी , जितु चौधरी,जितु खाचणे , पुरुषोत्तम पाटील, संदीप खाचणे, कोमल पाटील ,चंद्रकात बऱ्हाटे , सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!