भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

निंबादेवी धरण ओव्होरफ्लो,धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यभरात सततच्या जोरदार पावसामुळे बहुसंख्य धरणे क्षमतेने भरले. त्यात जळगाव जिल्ह्यातील धरणांचा समावेश आहे.त्याच प्रमाणे जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडासिम गावा जवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निसर्गरम्य प्रसिद्ध धरण, निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. निंबादेवी धरणाची पूर्ण पातळी दोन पॉईंट ४२८ दशलक्ष घनमीटर आहे

दरवर्षी पर्यटक पावसाळ्यात या धारणावर मोठ्या प्रमाणावर आनंद लुटण्यासाठी येत असतात.परंतु यावेळी निंबादेवी धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भीती असल्याने प्रशासनाकडून निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले.त्या मुळे आता पर्यटकांना धरणावर प्रवेश बंदी घालण्यात आली असून मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

विशेषत: जिल्हाभरातीलच नव्हे तर मध्य प्रदेशातीलही काही हौशी पर्यटक जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडा या गाव जवळील निंबादेवी धरणावर प्रेक्षणीय व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

दरम्यान, निंबादेवी धरणाच्या मुख्य भिंतीपासून सुमारे ५०० मीटर लांब अंतर व खालील बाजूने असलेल्या सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याचे समोर आल्याने सांडव्याची भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. ही माहिती मिळताच तहसीलदार यांनी पाटबंधारे विभागाला खबरदारीच्या सूचना देत निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. पर्यटकांना धरणावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!