रावेरसामाजिक

मोठे वाघोदा येथील शेतीचा वहिवाट रस्ता मोकळा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यासह शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क. आशीष चौधरी | वाघोदा बु ll ते दसनूर वहिवाट शेती रस्ता मोकळा करणे संदर्भात मा. तहसीलदार साहेब यांना दिनांक २०/१२/२३  पासून वेळोवेळी, तोंडी, लिखित स्वरूपात शेतकरी, सरपंच  व ग्रा. सदस्य यांनी निदर्शनास आणून दिले. रावेर तहसीलदार यांना दिनांक २३/०२)२४ रोजी प्रत्यक्ष घटनांसाठी भेट देऊनही आज पावेतो शासनाने  कोणतीही दखल घेतली नाही. या कारणास्तव आनंद भालेराव ग्रामपंचायत सदस्य यांनी आज  मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी सकाळी दहा वाजेपासून वाघोदा बु ll बस स्टँड परिसरात उपोषण सुरू केले आहे.

मोठा वाघोदा तालुका रावेर येथील वाघोदा बुद्रुक ते दसनूर या वहिवाट शेती शेतीमालाचे नेआण करण्यासाठी वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्यात यावा सदर शेतकऱ्यांना सध्या स्थितीमध्ये तीन चार किलोमीटरच्या फेऱ्याने मालाची नेआण करावे लागत आहे शेतकऱ्यांना निंभोरा रस्त्यावरून दसनूर ला जाऊन परत वाघोदा यावे लागते त्यामुळे जास्तीचा वेळ जास्तीचे डिझेल व वाहतूक खर्च जादा पैसे देऊन करावा लागत असल्याने आधीच उत्पन्न कमी व खर्च ज्यादा असे शेतकऱ्याचे गणित आहे या रस्त्यासाठी रावेर तहसीलदार यांनी २३/२/२५ रोजी भेट देऊन पाहणी केली मात्र अद्याप त्यावर कोणीतरीवाही न केल्याने दि.२५/३/२५ रोजी वाघोदा बुद्रुक बस स्थानक चौकात ग्रामपंचायत सदस्य आनंद भालेराव यासह शेतकरी उपोषणासाठी बसले आहेत. या उपोषणाला परिसरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , सदर निवेदन जिल्हाधिकारी जळगाव ,प्रांत कार्यालय फैजपूर, सावदा पोलीस स्टेशन , तलाठी कार्यालय वाघोदे बुद्रुक, भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे दिले आहे सदर रस्त्यावर खाजगी प्लॉट धारकांचे गटारीचे पाणी तुंबल्याने शेतकऱ्यांना पायी चालणे देखील कठीण होत आहे तरी संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!