छत्रपती श्री. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करा
सावदा, ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकरक वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे
छत्रपती श्री शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान असून राज्यातील काही माथेफिरू अकलेचे तारे तोडत माथेफिरू महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करून शिवप्रेमींनीच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत असून तेढ निर्माण करीत आहेत.यांच्यावर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी निवेदनाद्वारे मागणी सावदा पोलिस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील यांचे कडे केली आहे .

यांनी दिले निवेदन
अक्षय सोनवणे, प्रेम चौधरी, हर्षल चौधरी, ऋषिकेश पाटील, चेतन महाजन, दीपक महाजन, मनोज पाटील, चंद्रकांत पाटील,निखिल सोनवणे, दीपक महाजन, कृणाल पाटील, मनीष कोळी, खुशाल महाले, निखिल तायडे पंकज बाविस्कर,आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.