भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

नशिराबाद येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

संगीत श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञाचे आयोजन

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर तसेच श्री गणेश, महादेव शिवलिंग व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संगीत श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सात दिवसीय धार्मिक सोहळा बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ पासून प्रारंभ होणार असून दि. ४ मार्च २०२६ रोजी सांगता होणार आहे.


या ज्ञानयज्ञ सोहळ्यात दररोज पहाटे ५.३० ते ६.३० काकड आरती, सकाळी ७ वाजता विष्णुसहस्रनाम, सायंकाळी ४.३० ते ५.३० हरिपाठ तसेच रात्री ७.३० ते ११ या वेळेत भव्य श्रीमद् भागवत कथा होणार आहे. भागवत कथाचे निरूपण ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज (नशिराबादकर) यांच्या समधुर वाणीतून होणार आहे. दि. ४ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी कथेची सांगता होणार आहे.


या पवित्र सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून दररोज विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सात दिवसीय धार्मिक पर्वात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वासुदेव नामदेव माळी तसेच समस्त माळी पंच मंडळ, वरची आळी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

“समस्त ग्रामस्थ व माळी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर तसेच श्री गणेश-महादेव प्राणप्रतिष्ठेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संगीत श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कथेचे व महाप्रसादाचे यजमान वैकुंठवासी नामदेव लाहनू माळी व वै. सौ. इंदुबाई नामदेव माळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वासुदेव नामदेव माळी यांच्या तर्फे हा धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!