भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

डोळ्यात मिरची पूड फेकून साडे पाच लाख रुपये लुटले

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | डोळ्यात मिरची पूड फेकून व्यापाऱ्याकडील ५ लाख २७ हजार  २०० रुपये लुटून नेल्याची घटना अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर घडली.

अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी हे बुधवारी स्कूटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनमध्ये जात होते. त्या वेळी तोंडाला मास्क लावून तीन जण मोटारसायकलवर तिबलशीट आले. योग्य संधी साधत आरोपींनी अचानक त्यांच्या डोळ्यात मिरची फेकली. मिरचीमुळे व्यापारी गोंधळून गेले आणि काही क्षणातच आरोपींनी ५ लाख २७ हजार २०० रुपये रोकड असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये तिघे आरोपी स्पष्ट दिसत आहेत.

लागलीच या प्रकाराची माहिती यतीन कोठारी यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयितांना पकडण्यासाठी पथक रवाना केले. प्राथमिक तपासात लूट करणारे आरोपी धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरापर्यंत धडक दिली, मात्र तोपर्यंत त्यांनी पैशांचा वाटा करून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.सध्या पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत असून  लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे सांगण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!