पाच हजारांची लाच : कृषी अधिकाऱ्यासह तिघांना जळगाव एसीबीने केली अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेती साहित्यावर मिळणारी सबसीडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकाऱ्यासह तिघांना जळगाव एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
तक्रारदार हे जोगे वडगाव, ता.पाचोरा येथील रहिवासी असून ते परिवारासह गावात राहतात. तकारदार यांनी शासन योजनेअंतर्गत शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत सबसीडी मिळत असल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी करणेकामी सबसीडी मिळणेकरीता पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला होता. सदर कार्यालयाकडून नमुद साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी केले होते. सदर खरेदी केलेल्या साहित्याचा कृषी उप अधिकारी, कृषी कार्यालय, पाचोरा विभाग, जळगाव यांचेसोबत फोटो काढुन ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी लिलाधर देशमुख, कृषी उप अधिकारी, पाचोरा यांनी तक्रारदार यांचेकडे ६,०००/-रूपये लाच मागणी करून नमुद लाच रक्कम ही संजय पाटील, धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव यांचेकडे देणेबाबत सांगितले होते. त्याबाबत तकारदार यांनी त्यांचे विरूध्द आज दि.०२/०२/२०२६ रोजी लाप्रवि जळगाव घटकाकडे तकार दिली होती.
तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीची दि.०२/०२/२०२६ रोजी पचांचे समक्ष पडताळणी केली असता देशमुख यांनी कामाचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ६,०००/- रूपये लाच मागणी करून तडजोड अंती ५,०००/- स्विकारण्याचे मान्य करून ते खाजगी पंटर संजय पाटील, धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव यांचेकडे देण्यास सांगितले.
देशमुख यांनी सांगितले प्रमाणे तकारदार हे सदर लाच रक्कम संजय पाटील यांना देण्यासाठी त्यांचे धनदाई कृषी केंद्र, आबेवडगाव येथे गेले असता ते दुकानावर नसल्याने आरोपी देशमुख यांचे सांगणे प्रमाणे सदर लाच रक्कम ही दुकानावर हजर असलेले नितीन निकम यांना सदरची रक्कम लाचेची असल्याचे जाणीव असतांनाही त्यांनी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली म्हणून लिलाधर देशमुख, आरोपी खाजगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांचेविरूध्द पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार १)लिलाधर शिवाजीराव देशमुख, उप कृषी अधिकारी, वर्ग-३, पिंपळगाव २ पोचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पाचोरा, जि. जळगाव,
२) संजय प्रभाकर पाटील, व्यवसाय व्यापार, रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव, (खाजगी इसम), व्यवसाय मजुरी
३) नितीन इंदलसिंग निकम, व्यवसाय मजुरी,रा.आंबेवडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव, (खाजगी इसम), याना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प ला.प्र. वि. जळगांव.. पोनि/हेमंत नागरे, श्रेणी पो.उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील (चालक) पोकों/प्रदिप पोळ, पोकॉ राकेश दुसाने, नेम.ला.प्र.वि जळगांव यांनी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

